पवारांना समजून घेण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील -संजय

संजय राऊत | Sanjay Rauta's suggestive tweet

पवारांना समजून घेण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील -संजय

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना खा. संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाच्या अडचणीत अधिकच वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच सत्ता स्थापनेबाबत विचारले असता, सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्ये १५ दिवस लागले होते असे राऊत म्हणाले. ते पत्रकार परिषदे दरम्यान बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील, असे म्हणत भाजपला लक्ष केले. तसेच राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्या बैठका सुरु आहे. सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा शिवसेनेची ठाम भूमिका मांडली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होईल, सरकार शिवसेनेच्या नेतृत्वातच बनेल, असा इशारा देत भाजपचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. तसेच भाजपने सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार राऊत यांच्या या ठाम भूमिकेमुळे भाजपाची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथे भेट झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here