मुंबई मनपा महापौर पदासाठी किशोरी पेडणेकर यांचा अर्ज

मुंबई-मनपा-महापौर-पदासाठ-Mumbai-Municipal-Mayor-office

मुंबई मनपा महापौर पदासाठी किशोरी पेडणेकर यांचा अर्ज

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना मुंबईच्या नव्या महापौर होणार आहेत. शिवसेनेकडून त्यांनी महापौरपदाच्या उमेदवार म्हणून आज अर्ज भरला आहे. पेडणेकर या पालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका असून त्यांनी पालिकेच्या विविध पदांवर कामाचा त्यांना अनुभव देखील आहे. आक्रमक नगरसेविका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे सुहास वाडकर यांनी अर्ज भरला आहे.

पालिकेत महापौरांच्या दालनात शिवसेना सचिव अनिल परब यांची महापौर आणि सेना नगरसेवकांसोबत बैठक झाली. त्यात पेडणेकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला. सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना मातोश्रीवर बोलावून पेडणेकर यांना महापौरपद देण्यात येत असल्याचे सांगितले होते, असंही सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, दुपारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांच्या नावाची घोषणा केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here