आम्ही बहुमत सिद्ध करायला गेल्यावर सर्व समोर येईल – संजय राऊत

आम्ही-बहुमत-सिद्ध-करायला-We-the-majority-prove-it

आम्ही बहुमत सिद्ध करायला गेल्यावर सर्व समोर येईल – संजय राऊत

तासाभराच्या अंतराने सलग दुसरी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेचे नवे संकेत दिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत बोलणी कधी होणार? सत्ता कधी स्थापन होणार? भाजपासोबत जाणार का? अशा प्रश्नांची उत्तरे देताना राऊत म्हणाले की, आम्ही बहुमत सिद्ध करायला जाऊ तेव्हा सारे समोर येईलच. तेव्हा मीडियालाही बोलवूच.. असे सूचक वक्तव्य करून लवकरच राज्यात शिवसेना सत्ता स्थापन करणार असा संदेश भाजपाला दिलेला आहे.

राऊत म्हणाले, हे एका पक्षाचे सरकार नसेल. त्यामुळे हे सरकार स्थापन होण्यासाठी वेळ तर लागणारच. कारण वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा विचारासाठी वेळ घ्यावाच लागतो. यापूर्वीही अशा प्रकारचे सरकार अनेक राज्यांमध्ये स्थापन झालेले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व आघाडी आहे.

दोन्ही पक्ष मोठे आहेत. त्यांच्यासोबत काही मित्रपक्षही आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मित्रपक्षांशी चर्चा करणे गैर नाहीच. शरद पवार जे काल बोलले ते योग्यच आहे. त्यांना मित्रपक्षांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल असे बोलून पवारांच्या वक्तव्याची पाठराखण केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here