तीन पक्षाचा निर्णय पक्का, आम्हाला पाच वर्ष राज्य चालवायचे आहे – संजय राऊत

संजय राऊत | Deciding on a three-party, we want to run the state for five years

राज्यातील राजकीय कोंडी आता लवकरच फुटणार असल्याचे चीन दिसून येत आहे. राज्याला लवकरचं स्थिर सरकार मिळणार असून महाशिवआघाडीच्या चर्चा आता अंतिम टप्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी दिले. त्यानंतर आज शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील सरकार स्थापनेबाबत सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाशिवआघाडीबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रमुख नेत्यांच्या चर्चा सुरु आहेत. काल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली. त्यामुळे आता महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेच्या चर्चा अंतिम टप्यात आल्या आहेत.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अश्य्क्ष शरद पवार यांची मी भेट घेणार आहे. मात्र कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीचे प्रयोजन नाही. तसेच तीन पक्षांचा निर्णय पक्का आणि अंतिम आहे, हे राज्य आम्हाला ५ वर्ष चालवायचे आहे. त्यामुळे तीन पक्षांची बैठक ही मुंबईत होणार आहे, अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे लवकरच राज्यात महाशिव आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. तसेच शिवसेनेच्या जुन्या मित्र पक्षाला विरोधी बाकावर बसण्याची वेळ लवकरच येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here