भिन्न विचारसारणीचे पक्ष एकत्र येणार असतील तर, पूर्ण एकमताने एकत्र येणे गरजेचे – शरद पवार

शरद पवार | If different thinking parties are to come together, it is important to come together in complete harmony

बहुमत नसतानाही भाजपाने सरकार बनविले आहे. त्यांनी केंद्रातील सत्तेचा, राज्यपाल पदाचा गैरवापर केला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या दोन बैठका झाल्या होत्या त्यात महाविकास आघाडीला पाठींबा देण्यासाठी एकमत झाले होते. एखाद्या व्यक्तीला वेगळ मत असू शकते. मात्र ते त्याने बैठकीत मांडायचे असते. मात्र अजित पवार यांनी काहीही सांगितले नाही. असा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त ते साताऱ्यातील प्रीती संगमावर पोहचले होते. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाच वर्ष राज्य चालवायच असेल तर अनेक मुद्य्यांवर चर्चा होणे गरजेचे असते. महाविकासआघाडीसाठी भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष एकत्र येणार होते. अशा भिन्न विचारसरानीचे पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिनही पक्षांच्या भूमिका, मते वेगवेगळी असतात.

त्या सर्वांचे मत जाणून घेऊनच अनेक मुद्द्यांवर एकमत होणे गरजेचे असते. त्यासाठी वेळ द्यावा लागतोच. सर्वांचे एकमत झाल्यानंतरच पूर्ण विचाराने निर्णय घेतला पाहिजे”. असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी यावेळी दिले. अजित पवार यांच्या बंडामागे माझा हात नाही. तर भाजप सरकारला राष्ट्रवादीचा कोणताही पाठींबा नाही. विश्वास दर्शक ठरावाच्या दिवशी सर्व काही स्पष्ट होईल अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय होता. असे ही माता शरद पवारांनी मांडले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here