पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार आहे यावर संजय राऊत म्हणतात…..

माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या फेसबुक वॉलवरून केलेल्या मॅसेज वरून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असे चिन्ह दिसून येत आहे. आपल्या फेसबुक आणि ट्विटरच्या अकाउंट वरून भाजपाचे चिन्ह काढून टाकल्यामुळे लवकरच ते भाजपा पक्षाला सोडचिट्टी देणार अशाच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात बोलून दाखविल्या जात आहे. येत्या १२ डिसेंबरला म्हणजेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे त्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार का? या चर्चेला राज्यात रंगताना दिसत आहे.


या बाबत जेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सूचक विधान केले. पंकजा मुंडेच काय तर राज्यातील भाजपाचे अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पंकजा मुंडे यांची पुढची रणनीती येत्या १२ डिसेंबरला कळेल. पण पंकजा काय तर भाजपातील अनेक बडे नेते शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी उस्सुक आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे ते म्हणाले. तसेच बुलेट ट्रेनचं ओझं आमच्यावर नको अशा शब्दांत त्यांनी या प्रकल्पाला स्थगितीच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला दुजोरा दिला. तसेच नाणारबाबतच्या मागणीवर मुख्यमंत्री विचार करतील, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here