पक्षातील काही लोकांमुळेच रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला

रोहिणी खडसे | Due to some people in the party, Rohini Khadse and Pankaja Munde were defeated

पक्षातील काही लोकांनी कुरघोड्या करून विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या काही उमेदवारांना पाडले. रोहिणी खडसे यांचा सुद्धा हाच आरोप आहे तसेच पंकजा मुंडे समर्थक हेच बोलत आहे. असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच “पक्षाच्या उमेदवारांविरोधात कुरघोड्या करणाऱ्या अशा लोकांची नावं पुराव्यासहीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे,” असंही खडसे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले आज. पंकजा मुंडे यांच्या नाराजीवरुन सुरु असणाऱ्या चर्चेबद्दल खडसे बोलत होते.

परळीमध्ये पंकजांचा पराभव झालेला नसून पक्षातील लोकांनी केलेल्या कारस्थानामुळे त्या निवडणूकीमध्ये पडल्या. पक्षातील काही लोकांनी पंकजांविरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते करत आहेत. रोहिणी खडसेंविरोधात तर अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे काम केली आहे.

मी स्वत: अशा अनेक कार्यकर्त्यांना ओळखतो. मी या सर्वांची नावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळवली आहे. याला बराच काळ झाला असला तरी त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नसून त्यांच्यावर कारवाई होण्याची वाट पाहत आहे,” असे ही खडसे म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here