विभागीय बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर

पंकजा मुंडे | Pankaja Munde absent at the departmental meeting

भाजपाच्या मराठवाडा विभागीय आढावा बैठकीस आज सकाळी दहा वाजता संभाजी नगरमध्ये सुरूवात झाली. मात्र तोपर्यंत भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे बैठकीच्या ठिकाणी न आल्याने त्या या बैठकीस येणार की नाही? याबद्दल चर्चा सुरू होती. दरम्यान, दुपा री बैठक काही वेळासाठी थांबल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत, पंकजा मुंडे या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची बैठकीस अनुपस्थिती असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक व मराठवाडास्तरीय नेत्यांची उपस्थिती आहे.पंकजा मुंडे यांना बैठकीचे निमंत्रण होते. मात्र तब्येत ठीक नाही, असे त्यांनी मला सांगितले. त्यांनी माझी परवानगी घेतली, त्यामुळे त्यांना आरामाचा सल्ला दिला. शिवाय त्यांना १२ तारखेच्या कार्यक्रमाची देखील तयारी करायची आहे, त्यामुळे तेव्हा त्यांची भेट होईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here