नागरिकत्व विधेयकाला शिवसेनेने का पाठिंबा दिला यावर खासदार सावंत यांचे मत

अरविंद सावंत | Sawant's opinion on why the Shiv Sena supported the citizenship bill

नागरिकत्व विधेयक सोमवारी बहुमताने पारित करण्यात आलेले आहे. यावेळी शिवसेनेनेही याला पाठींबा दर्शवला. यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचे असल्याने शिवसेनेने त्याला पाठींबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार अरविंद सावंत यांनी आपले मत मांडलेले आहे.

सावंत म्हणाले, “राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आले आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे. किमान समान कार्यक्रमासाठी आम्ही युपीएमध्ये गेलेलो नाही, त्यामुळे नागरिकत्व विधेयकाला विरोध करायचे आमच्यावर बंधन नव्हते. येत्या काळात याबाबत शिवसेनेची भुमिका स्पष्ट करु असे सावंत यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here