आता कुणीही कुठलाही दरवाजा उघडा ठेऊ नका, राऊतांचा फडणवीसांना टोला

फडणवीसांनी-वेदनेवर-संयमा-Fadnavis-pain-restraint

आता कुणीही कुठलाही दरवाजा उघडा ठेऊ नका, राऊतांचा फडणवीसांना टोला

शिवसेनेने साथ दयावी भाजपाची दारे उघडी आहे असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत मांडले होते. या वक्तव्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. ‘आता कुणीही कुठलाही दरवाजा उघडा ठेवू नका, जेव्हा उघडायचे होते तेव्हा उघडले नाही. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या मान्य केल्या नाहीत. आता चर्चेची वेळ निघून गेली, असल्याचे संजय राऊत यांनी केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शिवसेनेने आजही साद दिली तरी आमचे दार उघडेच आहे. आम्ही कधीही हाक द्यायला तयार आहोत पण समोरुन प्रतिसाद यायला हवा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. २०१९ ची निवडणूक आम्ही महायुतीत लढलो, त्याला राज्याच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले. तरीही शिवसेनेने मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केल्याचा, आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच आमच्या मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केला त्यामुळे आम्हाला विरोधात बसावं लागले आहे, असे फडणवीस म्हणाले होते.

देशातील आर्थिक मंदी नव्हते तर महामंदी आहे, माजी मुख्य सल्लागाराचे मत

शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा, फोटोचा वापर प्रचारात केला असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. याला देखील संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. ‘मोदींचे फोटो लावणे गुन्हा नाही. आम्ही तेव्हा युतीत होतो. भाजप महाराष्ट्रात बाळासाहेबांचे फोटो लावून वाढला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच, भाजपने आमचे उमदेवार पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जर आम्ही स्वतंत्रपणे लढलो असतो तर १०० च्या आसपास जागा जिंकलो असतो, असा दावा त्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here