भाजप नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून सावरकरांच्या विचार विरोधात

शिवसेना-कधीही-दिल्लीपुढे-Shiv Sena-ever-before Delhi

भाजप नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून सावरकरांच्या विचार विरोधात
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची आमची भूमिका आजही कायम आहे. उलट भाजपच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणून सावरकरांच्या विचारांच्या विरोधात जात आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पहिल्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. सिंधू नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भूमीला एक देश बनवणे, हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वप्न आणि ध्येय होते. असे उदगार सावरकर यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यानी काढले होते.

भाजप सरकार सावरकरांच्या विचारांच्या विरोधात जाऊन सिंधू नदीजवळच्या आणि पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना भारतात घेऊन त्यांना नागरिकत्व देत आहे. हा सावरकरांचा अपमान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष ज्या सावरकरांच्या विचारांवर बनला आहे, त्या सावरकरांना हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा मान्य झाला नसता. सध्या देशात महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि कृषी संकट हे मोठे प्रश्न आहेत. परंतु नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे लोकांचे मूळ मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here