Skip to content Skip to footer

युती तुटली असली तरी आम्ही धर्मांतर केले नाही मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला

युतितुटली असली तरी आम्ही धर्मांतर केलेले नाही आम्ही आजही हिदुत्ववादी आहोत. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि फडणीवसांवर निशाणा साधाला. ते नागपूर येथे बोलत होते. ते म्हणाले, ‘ हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावरणारी जी मंडळी आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले. ‘मी मुख्यमंत्री नाही तर आज कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलो आहे. जे शिवधनुष्य हाती घेतलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या साथीने पेललं आहे. आव्हान मोठं आहे, मात्र छोटी आव्हानं आपण स्वीकारत नसतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, शिवसेना नेहमी मोठी आवाहनच घेते. हे आव्हान स्वीकारलं नसतं तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून ते माझ्यासाठी योग्य ठरलं नसतं. तसेच मुख्यमंत्रिपद मोठं आहे, त्यामुळे त्याची आव्हानं देखील मोठी आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a comment

0.0/5