राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नागपुरात दाखल

NCP president Sharad Pawar enters Nagpur

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. तर राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरून सुद्धा आपल्या नाकर्तेपनामुळे भाजपाला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आलेली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस ,पहिला दिवस विरोधकांनी सावरकरांच्या मुद्यांवर महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राज्यात ठाकरे सरकार विराजमान झाल्यापासून हे नागपुरातील पहिले हिवाळी अधिवेशन असल्यामुळे पवार दोन दिवस नागपुरात थांबणार आहेत. यावेळी पवार विधर्भीय जनतेच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकारला मार्गदर्शन करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेचा पूर्व आणि पश्चिम विदर्भात विस्तार करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

ते संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभय सभागृहांतील आमदारांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावावर ते शिक्कामोर्तब करू शकतात अशाही चर्चा सुरू आहेत. यासोबतच तीनही पक्षांमध्ये सरकार चालवताना उत्तम समन्वय कसा राहील याबाबत पवार हे नागपूरभेटीत मित्र पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here