अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील – संजय राऊत

अमृता-फडणवीसांना-शिवसेने-Amrita-Fadnavis-Shiv Sena

अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील – संजय राऊत

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलुन दाखविले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे जिल्हा प्रमुखांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री झालायव्हर ते प्रथमच शिवसेना भवन येथे आलेले होते. संजय राऊत यांचा अंगुलीर्निदेश शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडे दिसतो. ‘फक्त ठाकरे आडनाव लावून चालत नाही’ अशा शब्दात मिसेस फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला होता.

महाराष्ट्रानंतर आता झारखंडही भाजपच्या हातातून निसटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी झारखंडमध्ये मोठी ताकद लावली होती. मोदींच्या नावे मतं मागितली गेली. नवीन नागरिकत्व कायदा आल्यानंतर त्याचा फायदा होईल, अशी भाषणं झाली. मात्र झारखंडच्या गरीब आणि आदिवासी जनतेने भाजपला नाकारलं. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार झारखंडमध्ये येताना दिसत आहे. महाराष्ट्रानंतर भाजप हातून का गेलं, यासाठी भाजपला आत्मचिंतनाची गरज आहे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here