वंचितचे प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

वंचितचे-प्रकाश-आंबेडकर-म-Deprived-light-ambedkar-m

वंचितचे प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरहे पहिल्यांदाच मुख्यमंतयांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी जाणार आहे. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना भेटीचं निमंत्रण दिले आहे.

आज दुपारी एक वाजता प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘मातोश्री’वर ही भेट होणार आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पहिल्यांदाच जाणार आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी दलित राजकारणाच्या अनुषंगाने गेल्या एक-दीड वर्षात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जरी यश मिळाले नसले, तरी वंचितचा फटका भल्याभल्यांना बसल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसून आले होते.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व नेत्यांना भेटून आपली सर्वसमावेशक प्रतिमा उभी करण्याच्या तयारीत आहेत. ही महत्त्वाची आणि ऐतिहासिक भेट आहे. या भेटीत राजकीय चर्चा होईलच, पण ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना शहरी नक्षलीचा आरोप करत अटक करण्यात आली आहे, त्यांच्या सुटकेच्या दृष्टीनेही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here