Skip to content Skip to footer

“बाल भिकारी मुक्त भारत” करण्यासाठी लहान बालकांचे उपोषण

“बाल भिकारी मुक्त भारत” करण्यासाठी लहान बालकांचे उपोषण

आज सर्वत्र लहान बालके रस्त्यावर, मंदिरात, रेल्वेमध्ये भीक मागताना आपल्याला आढळून येतात. काहींची मजबुरी असते तर काही आपले पोट भरण्यासाठी स्वतःच्या मुलांचा नाहीतर चोरी करून आणलेल्या मुलांचा भीक मागण्यासाठी सर्रास वापर करतात. आज आपल्या देशाचे भविष्य फाटक्या कपड्यात रस्त्यावर भीक मागताना पाहून देशाची मान शरमेने नक्कीच झुकलेली दिसून येते. “आपण भीक म्हणून पैसे देतो म्हणूनच या लहान बालकांवर परीस्तिथी आणणाऱ्या समाजकंटकांची शक्ती वाढलेली दिसून येते. यावर कायमचा तोडगा म्हणून “बाल भिकारी मुक्त भारत” करण्यासाठी सलोनी नावाच्या मुलीने उपोषण सुरु केले आहे.

कल्याण पासून साधारण ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबगाव येथील मैत्रीकुल नावाच्या स्वयंसेवी संस्थेत ही विध्यार्थी शिकत आहे अशी माहिती समोर आलेली आहे. “बाल भिकारी मुक्त भारत” हे चिरंजीवी या संघटनेच्या माध्यमातून कल्याण जवळ हे उपोषण सुरु आहे. मागील तीन दिवसापासून सलोनीचे उपोषण सुरु आहे. परंतु एकही प्रसार माध्यमांना या विषयाची दाखल घ्यावी असे वाटले नाही. सध्या भारतात सुमारे ६० लाख भिकारी आहेत. आज इतका प्रचंड मोठा आकडा समोर आलेला असल्यामुळे ही आपल्या देशाच्या भविष्यासाठी चिंतेची बाब आहे.

बालमजुरी कायद्यामध्ये बालकाचे वय १४ वरून १८ करण्यात यावे, बालमजुरी हा अजामीनपात्र गुन्हा असावा, बालमजूर म्हणून कामाला ठेवलेल्या मालकावर किंवा त्या कंपनीवर ५ लाख ते १० लाखाचा दंड आकारावा, गुन्हेगाराचा तुरुंगवास ५ वर्षे ते १० वर्षांपर्यंत वाढवावा, बालन्यायालयांची संख्या वाढवून आठवड्याचे सातही दिवस सुरू राहिले पाहिजे, आमदार निधीतून बालकांसाठी बालगृहात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळावे, बालगृहातून मुक्त झालेल्या बालकांचा मासिक पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती असावी, १ आमदार १ बालगृह असे प्रमाण असावे, या बालकांसाठी स्वतंत्र शाळा असाव्यात, प्रत्येक पोलिस ठाण्याकडे त्यांच्या हद्दीतील बालभिकाऱ्यांची नोंदणी असावी या प्रमुख मागण्यांसाठी उपोषण करत असल्याचे मत उपोषणकर्त्या सलोनी या बालिकेने मांडल्या आहे.

Leave a comment

0.0/5