शेतकरी आनंदी हवा, ही शासनाची भूमिका – मुख्यमंत्री

शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका राहिली आहे. कर्जमुक्ती हा प्राथमिक उपचार असला तरी शेतीच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीबद्दल राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपला अन्नदाता सुखी असावा हीच आपली भावना असते. शेतकऱ्यांसाठी या सरकारचे दरवाजे कायम खुले असतील. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार समर्थपणे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी या सरकारचे दरवाजे कायम खुले असतील.

आता दिलेली कर्जमुक्ती ही शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठीचा केवळ प्रथमोपचार असून या सरकारच्या वतीने शेती विकासासाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सूचनांना हे सरकार कायमच प्राधान्य देईल आणि शेती बाबतचे धोरण ठरविताना नेहमीच शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here