हे सरकार बनवण्यासाठी शरद पवारांचा चमत्कार कामी आला – मुख्यमंत्री

ads

हे सरकार बनवण्यासाठी शरद पवारांचा चमत्कार कामी आला – मुख्यमंत्री

ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले. कमी आमदार असतानाही भाजपवर मात केली असून हे सरकार बनवण्यासाठी शरद पवारांचा चमत्कार कामी आला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन तातडीने निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मोठे योगदान आहे असे उग्दार सुद्दा बोलून दाखविले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here