वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करणारे विधान?

महाराष्ट्रात | Uddhav Thackeray's statement on the wall of Varsha Bungalow?

महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत. सत्तापालट झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ‘वर्षा’ बंगला सोडावा लागला. या बंगल्यावर आता उद्धव ठाकरे जाणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे जाण्याअगोदर वर्षा बंगल्यावरुन महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वादविवाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण वर्षा बंगल्याच्या एका भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही वाक्य लिहले गेल्याचे समोर आले आहे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर सध्या हा बंगला सार्वजनिक विभागाकडे आहे. उद्धव ठाकरे लवकरच या बंगल्यावर राहण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी या बंगल्याची पाहणी करण्याकरता गेले होते. मात्र, यावेळी एक धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

वर्षा बंगल्याच्या एका भिंतीवर उद्धव ठाकरे यांचा तिसरस्कार करणारी वाक्य आढळून आली. त्यामुळे या प्रकारावरुन भाजप-शिवसेना वाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here