खासदार सुजय विखेनी घेतली अधिकाऱ्यांची पाण्यासंदर्भात बैठक

बैठक | MP Sujay Vikheni held a water meeting of the officers

कालवा सल्लागार समितीच्या बैठका परस्पर होत आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. पाणी द्या, पाणी द्या म्हणत असताना त्यासाठी किती बैठका घ्यायचे आहेत, त्यातून काही फलित होणार नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे कुकडी आवर्तनाचे नियोजन योग्य पद्धतीने झाले पाहिजे. तुमच्या अडचणी मला मान्य आहेत. मात्र जनतेला यातून त्रास होता कामा नये, असा इशारा खासदार सुजय विखे यांनी दिला. आगामी काळात शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यासाठी त्या त्या तालुक्यातच बैठकीचे नियोजन करावे, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली .

याबैठकीला खासदार सुजय विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले होते .यावेळी आमदार बबनराव पाचपुते,कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर , कार्यकारी अभियंता आर. के. जगताप, नामदेव राऊत, अशोक खेडकर सह सरपंच , पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

खासदार सुजय विखे म्हणाले की, कालवा समितीच्या बैठकी परस्पर घेतल्या जातात, ही बाब अतिशय गंभीर आहे. आवर्तन सुटणार आहे. या बाबत मला आत्ताच कळले आहे. म्हणून मी तातडीने ही बैठक घेतली आहे. आगामी काळामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन करताना विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो यात ताळमेळ घालने अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या क्षेत्रामध्ये कुकडीचे पाणी जाते, तेथील स्थानिक आमदारांना सुद्धा विश्वासात घ्या . मला कोणत्याही प्रकारे पाण्याची श्रेय घ्यायचे नाही व घेणार नाही.

जनता भरडली जाऊन नये, हाच माझा त्यामागचा उद्देश आहे, असे स्पष्टीकरण खासदार सुजय विखे पाटील त्यांनी यावेळी दिली . कुकडीचे आवर्तन सोडताना शेवटच्या घटकापर्यंत पाणी कशा पद्धतीने मिळेल, त्याचे नियोजन दरवेळेला होते. प्रत्येकदा अनेक राजकीय घडामोडी त्यामध्ये घडतात, त्याचाही आम्ही आता शोध घेणार आहोत. नेमके सतरा टीएमसी पाणी नेमके जाते कुठे याचा सुद्धा आम्ही शोध घेणार असल्याचे खासदार विखे यांनी बोलून दाखविले. पाण्यासाठी आज सगळ्यांना सातत्याने मागणी करावी लागते, ही बाब सुद्धा योग्य नाही, आपण बैठक घेतो नियोजन करतो. पण त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने होतो का, हा खरा प्रश्न आहे , जर नियोजन होणार नसेल तर त्या बैठका घेऊन काय उपयोग ? असा सवालही त्यांनी यावेळी विखेंनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here