सोमय्यांना पक्षात काम नाही, तर शेलारांना रडून-रडून मंत्री पद

सोमय्यांना-पक्षात-काम-ना-Somai-party-work-na

सोमय्यांना पक्षात काम नाही, तर शेलारांना रडून-रडून मंत्री पद

राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण राज्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा आमदार आशिष शेलार आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. सोमय्यांना पक्षात काम मिळत नाही तर तर शेलार रडल्यामुळे अमित शाहांनी त्यांना मंत्रिपद दिलेले आहे, अशा शब्दात आव्हाडांनी दोन्ही नेत्यावर टीकास्त्र सोडलेले आहे.

आशिष शेलार यांना फडणवीस सरकारच्या काळात शेवटी-शेवटी मंत्रिपद दिले गेले. तेसुद्धा शेलार खूप रडले म्हणून अमित शाहांनी त्यांना मंत्रिपद दिले, अमित शाह नसते तर त्यांना देवेंद्रजीनी कधीच मंत्रिपद दिले नसते. त्यामुळे मी अमित शाहांवर बोलल्यामुळे शेलारांना माझ्यावर टीका करणं भाग होतं, असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता जवाहरलाल नेहरु विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत आहेत. जेव्हा विचारसरणी किंवा बुद्धिमतेला सरकार घाबरतं तेव्हा देशात अराजकता येण्याची शक्यता असते’, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. आव्हाडांच्या टीकेला उत्तर देताना, ‘जितेंद्र आव्हाड एक जबाबदार कॅबिनेट मंत्री झाले आहेत. तेव्हा आता केवळ आमदार असल्यासारखं वागू नका आणि या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविषयी सांभाळून बोला, अशी ताकीद आम्ही त्यांना देतोय’, असे आशिष शेलार म्हणाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here