याच मुद्यावर भाजपा मनसे एकत्र येऊ शकतात – फडणवीस

फडणवीस | BJP MNS can come together on this issue

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंगळवारी ७ जानेवारीला प्रभादेवी येथील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये गुप्त भेट झाली होती. मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली होती.ते बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच आॅफ द ईअर पुरस्कारांच्या निमित्ताने दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सभागृह ते गुरुवारी बोलत होते. या मानाच्या पुरस्कार वितरणास राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर ‘धुरळा’ या चित्रपटातील कलाकारांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मनसे आणि भाजपच्या विचारात, कार्यपद्धतीत अंतर आहे. मात्र, भविष्यात मनसेच्या भूमिकेत बदल झाला, विचार व्यापक झाले, तर परिस्थितीनुसार युतीचा विचार होऊ शकतो. आज तरी तशी शक्यता नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य युतीचा खुलासा केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here