बाळासाहेबांचे स्मारक बांधताना झाडे तोडणार नाही तर लावणार – मुख्यमंत्री

ठाकरे-सरकारचे-सरकारी-कर्-Thackeray-Government-Government-Kar Balasaheb, the trees will not be cut down and planted

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी एमजीएम कॅम्पस मधील प्रियदर्शनी उद्यानातील प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी केली. स्मारकासाठी शेकडो झाडे तोडली जाणार असा आरोप विविध संघटना आणि पर्यावरण प्रेमींकडून केला जात होता. मात्र ‘स्मारक झाल्यावर तुम्ही बघा , इथे झाडे तोडली नाही तर लावलेली दिसतील’असा शब्द उद्धव ठाकरे यांनी पत्रकार व पर्यावरणप्रेमींना दिला. मी झाडे तोडणार नाही तर आणखीन कशी लावता येतील याचा विचार करतोय असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या संभाजी नगर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी प्रियदर्शनी उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेची पाहणी केली .पालकमंत्री सुभाष देसाई , प्रधान सचिव अजय मेहता ,महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह त्यांनी या स्मारकाची संपूर्ण माहिती जाणून घेतली .

विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील मेट्रो कारशेडला स्थगिती देत आरे कॉलनीतील एकही झाड यापुढे तोडू देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता . परंतु संभाजी नगर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here