नाही तर भाजपाचे एकही कार्यालय ठेवणार नाही, संभाजी ब्रिगेडची धमकी

नाही तर भाजपाचे एकही कार्यालय ठेवणार नाही, संभाजी ब्रिगेडची धमकी

“आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकांवरून सुरु झालेला वाद राज्यात चिघळू लागलेला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी भाजपा आणि त्यांच्या नेत्यांना फैलावर घेतलेले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आता भाजपा विरोधात आंदोलन सुरु झालेली आहेत. आता त्या पाठोपाठ संभाजी ब्रिगेडने सुद्धा या प्रकरणात उडी घेतलेली आहे.

“आजके शिवाजी नरेंद्र मोदी” हे वादग्रस्त पुस्तक लवकरात लवकर भाजपाने मागे घ्यावे नाहीतर राज्यात एकही भाजपाचे कार्यलय शिल्लक राहणार नाही असा इशारा वजा धमकी पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिलेली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवावर मते मागून निवडून येता आणि निवडून आल्यावर छत्रपती शिवाजी राजेंची तुलना नरेंद्र मोदी यांच्याबरोबर करून खोडसळपणा करता असे बोल संभाजी ब्रिगेडने भाजपा नेत्यांना सुनावले आहे.

या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, आताही ‘आजके शिवाजी :नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलेला आहे.

“खोटं बोल पण रेटून बोल” भाजपा आयटी सेलची करामत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here