अनेकांना वाटल मी निवृत्त होईल, पण त्यांना ते जमले नाही – शरद पवार

NCP president Sharad Pawar enters Nagpur

अनेकांना वाटल मी निवृत्त होईल, पण त्यांना ते जमले नाही – शरद पवार

अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित कृषिक 2020 चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच अभिनेते आमिर खान देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘अनेकांना वाटत होतं मी निवृत्त होईन. पण, त्यांना ते जमलं नाही आणि राज्यातील जनतेने ते घडू दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी भाजप आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. ते बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन उद्घाटन समारंभ कार्यक्रमावेळी बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘चुकीच्या संशोधनांवर जरुर बंदी घालायला हवी. परंतू, कृषी सारख्या क्षेत्रात सखोल आणि विस्तारीत संशोधन नेहमीच झाले पाहिजे अशी आपेक्षाही शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केली. याचप्रमाणे देशातील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांवर आज अनेक मर्यादा आल्या आहेत. खरं म्हणजे कृषी क्षेत्रातील संशोधनाबाबत न्यायलायने काही बोलावे का याबाबाबत मी बोलणार नाही. तो त्यांचा अधिकार आहे, असे शरद पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here