पाहिलं विभागीय मुख्यमंत्री कार्यालय नवी मुंबई येथे सुरु

पाहिलं-विभागीय-मुख्यमंत्-First-division-chief

पाहिलं विभागीय मुख्यमंत्री कार्यालय नवी मुंबई येथे सुरु

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यानुसार जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नवी मुंबईतून झाली आहे. नवी मुंबईत बेलापूर येथील कोकण भवनमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल उपायुक्त सिद्धाराम शालीमठ यांनी दिली.

सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, सरकारस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवदने, मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्वीकारून त्यावर कार्यवाहीसाठी संबंधीत क्षेत्रीय स्तरावरील सरकारी यंत्रणेकडे पाठविण्यात येतात. यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्यात आलं आहे.

उपायुक्त हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय म्हणून काम पाहणार असून, एक नायब तहसीलदार, एक लिपिक/लिपिक टंकलेखक ही पदे काम पाहणार आहेत. विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाच्या क्षेत्रीय कक्षात सी.एम.ओ सर्वसामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ याबाबतची पोचपावती संबंधितांना दिली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here