Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची संजय राऊत यांच्याकडून घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची संजय राऊत यांच्याकडून घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा ट्विटरवरुन केली. “सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं. राज्यात आता ठाकरे सरकार स्थिरस्थावर होत आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता ५५ दिवस झाले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली.

शिवभोजना थाळीसाठी आधारकार्डची सक्ती हे निव्वळ अफवा – मुख्यमंत्री कार्यालय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ३० डिसेंबर २०१९ रोजी ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश होता. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या १४, शिवसेनेच्या १२, तर काँग्रेसच्या १० मंत्र्यांनी शपथ घेतली.

Leave a comment

0.0/5