आमचे सरकार खचणार नाही, पाच वर्ष काम करीत राहील – मंत्री गुलाबराव पाटील

आमचे-सरकार-खचणार-नाही-पाच-Our-government-will-spend-no-five

आमचे सरकार खचणार नाही, पाच वर्ष काम करीत राहील – मंत्री गुलाबराव पाटील

कोणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचे आहे. या गोष्टीचे कुणीही समर्थन करणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार खचावे, म्हणून भाजपकडून निरनिराळे प्रयत्न सुरू आहेत. फोन टॅपिंग हा त्यातलाच एक भाग आहे,’ अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर केली. ते जळगाव येथील सभेत बोलत होते.

फोन टॅपिंग संदर्भात बोलताना ते म्हणाले, गेल्या काळातही फोन टॅपिंगचे असे प्रकार घडले आहेत. ही एक प्रकारची रणनीती असते. मात्र, कुणाचेही फोन टॅपिंग करणे चुकीचेच आहे. हा प्रकार करण्यामागे कोण आहे, हे लवकरच समोर येईल, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आमचे सरकार खचणार नाही. 5 वर्षे काम करतच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. फोन टॅपिंग आणि स्नूपिंग झालेल्या नेत्यांमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here