बलात्काराचे समर्थन करणारे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे

बलात्काराचे-समर्थन-करणार-Rape-support-will-do

बलात्काराचे समर्थन करणारे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे

मी बलात्कार करावा इतकी काही तुझी लायकी नाही, असे महीलांविषयी निंदनीय वक्तव्य ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांनी संसदेत महिला खासदाराविषयी केले होते. त्यांनाच भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आल्याचे समजत आहे. बोल्सोनारो यांनी अनेकदा बलात्काराचे समर्थन करणारे, लिंग, वर्णभेदी वक्तवे केली आहेत. वादग्रस्त व्यक्तीला भारतात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ब्राझीलचे ३८ वे राष्ट्राध्यक्ष असलेले बोल्सोनारो हे पूर्वी लष्करी अधिकारी होते. जानेवारी २०१९ पासून ते ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष आहेत. जी-२० आणि ब्रिक्स समिटच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी बोल्सोनारो यांना प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण दिले होते. बोल्सोनारे यांचे भारतात आगमन झाले आहे. रविवारी राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला ते उपस्थितीत असणार आहेत. यापूर्वी १९९६ आणि २००४ ला ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे होते..

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here