उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येत जाणार – खासदार संजय राऊत

उद्धव-ठाकरे-७-मार्चला-अयो-Uddhav-Thackeray-3-March-Aio

उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येत जाणार – खासदार संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्च रोजी अयोध्येत जाणार असल्याची माहिती, शिवसेनेचे नेते खासदार संदय राऊत यांनी दिली. ‘राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत जातील, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. परंतु आता ते ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसंच त्यांचा संपूर्ण कार्यक्रम ठरला आहे,” असे राऊत म्हणाले. अयोध्येत जाण्याचा हा उद्धव ठाकरेंचा हा दुसरा दौरा आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार याबाबात घोषणा झाली होती. सरकारला १०० दिवस झाल्यानंतर ते जातील असे म्हटलं होते. परंतु आता ७ मार्चला ते अयोध्येला जातील. या ठिकाणी ते राम लल्लाचं दर्शन घेतील. तसंच शरयू तीरावर आरतीही करतील,” अशी माहिती राऊत यांनी दिली. यावेळी हजारो शिवसैनिकही अयोध्येत जातील, असंही त्यांनी नमूद केले आहे. “हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याचे कोणीही राजकारण करू नये. राजकीय दृष्टीने याकडे पाहू नये,” असेही राऊत यांनी स्पष्ठ केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here