Skip to content Skip to footer

बूट चोरीला जाण्याच्या धास्तीने फडणवीसांनी हातात धरले बूट

बूट चोरीला जाण्याच्या धास्तीने फडणवीसांनी हातात धरले बूट

भाजपा नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरु केलेल्या लाक्षणिक उपोषणाला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सुमारे पंधरा मिनिटे हजेरी लावली. मात्र या पंधरा मिनिटांच्या काळात त्यांना त्यांचे बूटच चोरी जाण्याच्या धास्तीने ग्रासले असल्याचे चित्र उपोषणस्थळी पहायला मिळाले. फडणवीस लाक्षणिक उपोषणाच्या मंचावर बूट हातात घेऊनच वावरले. एवढेच नव्हे तर एका हातात बूट घेऊनच त्यांनी मीडियाला बाईट्सही दिल्या.

एअर इंडियाची १७ मार्चला लागणार बोली

स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली पंकजा मुंडे यांनी आज मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला त्यांच्या खासदार भगिनी प्रीतम मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस उपोषणस्थळी सुमारे पंधरा मिनिटे होते. या पंधरा मिनिटांपैकी आठ मिनिटे त्यांनी भाषण केले आणि उर्वरित वेळेत मिडीयाला बाईट्स दिल्या.

Leave a comment

0.0/5