Skip to content Skip to footer

उल्हास व वालधुनी नद्यांच्या स्वछतेसाठी खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

उल्हास व वालधुनी नद्यांच्या स्वछतेसाठी खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या स्वछतेसाठी आणि त्या दोन्ही नद्या पुर्नजीवित करण्याच्या संदर्भात कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान विविध विषयावर चर्चा सुद्धा करण्यात आली.

मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर उल्हास व वालधुनीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे अशी मागणी खासदार शिंदे यांनी पर्यावरण मंत्र्यांकडे केलेली आहे. तसेच शिंदे यांच्या सुचवलेल्या उपाययोजनांवर आदित्य ठाकरे यांनी साकारत्मक प्रतिसाद दिलेला आहे.

नागरी सांडपाणी तसेच नदी परिसरातील औद्योगिक कारखान्यांमधील रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे वालधुनी व उल्हास नद्या मोठ्या प्रमाणावर दुषित झाल्या आहेत. याचा पारिणाम नद्यांमधील जलचर प्राण्यांवर सुद्धा होत आहे. आज नद्यांच्या दुषित पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब खासदार शिंदे यांनी पर्यावरण मंत्र्यांच्या निर्देर्शनास आणून दिली.

प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि त्यामुळे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन प्रदूषण कमी व्हावे, यासाठी सतत आग्रही असणारे मंत्री आदित्य ठाकरे या दोन्ही नद्यांच्या पुर्नजिवित करणासाठी नक्कीच पर्यावरण विभागाकडून यावर निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

Leave a comment

0.0/5