एकता कपूरला पद्मश्री भेटतो, पण खाशाबा जाधव यांना नाही

एकता-कपूरला-पद्मश्री-भेट-Padma Shri-Gift to Ekta-Kapoor

एकता कपूरला पद्मश्री भेटतो, पण खाशाबा जाधव यांना नाही

केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पद्म-पुरस्कारांवरून आधी गायक अदनान सामीवर टीका झाल्याने वाद निर्माण झाला होता. यावर मनसेचे अमेय खोपकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. आता दिग्दर्शिका एकता कपूर यांना हा पुरस्कार दिल्याने वाद निर्माण झाला आहे. एकता कपूरला पद्मश्री पुरस्कार मिळतो. मग माझ्या बाबांना का नाही?, असा सवाल भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजीत जाधव यांनी केंद्र सरकारला केला आहे.

एकता कपूरला यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिने नेमकं असं कोणतं सामाजिक काम केलं ज्यामुळे तिला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला??, अशी खंत रणजीत जाधव यांनी व्यक्त केली.भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या मुलानेही, खाशाबांच्या बाबतीत होत असलेल्या उपेक्षेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत अनेकदा खाशाबा जाधव यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याची मागणी केली, मात्र केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही रणजीत यांनी केला आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी युवा पिढीने जिद्दीने लढावे – डॉ.नीलम गोऱ्हे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here