नरेंद्र मोदी माझे पंतप्रधान पाकडयांनो तुम्ही नाक खुपसू नका – अरविंद केजरीवाल

नरेंद्र मोदी माझे पंतप्रधान पाकडयांनो तुम्ही नाक खुपसू नका – अरविंद केजरीवाल

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाला रोखण्याचा प्रयत्न आप, काँग्रेस करीत असल्याने हि लढाई चांगलीच रंगतदार बनली आहे. मात्र या राजकीय युद्धात पाकिस्तानची देखील एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांने नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला पराभूत करा असे आवाहन दिल्लीकरांना केले आहे. पाकिस्तानमधील मंत्री फवाद हुसैन यांनी ही मागणी केली आहे.

फवाद हुसैन यांनी ट्विट करुन म्हटलंय की, भारतातील लोकांनी नरेंद्र मोदींना हरवलं पाहिजे. यावेळी दिल्ली विधानसभेत हरण्याची भीती असल्याने त्यांच्याकडून दबावाखाली अनेक अजब दावे करण्यात येत आहेत. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत. काश्मीर, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ढासळती अर्थव्यवस्था यावर देश-विदेशातून सुरु असणाऱ्या प्रतिक्रियेमुळे नरेंद्र मोदींचे मानसिक संतुलन बिघडलं आहे.

यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चौधरी यांना फटकारले.भारताच्या अंतर्गत घडामोडींमध्ये नाक खुपसू नका, असा इशारा केजरीवाल यांनी चौधरी यांना दिला. केजरीवाल यांनी ट्विट केले असून ते म्हणाले की, नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत. तसेच ते माझे देखील पंतप्रधान आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक ही आमची अंतर्गत बाब आहे. त्यात अतिरेकी कारवाया करणाऱ्या देशाने नाक खुपसू नये. ते सहन केले जाणार आहे.अशी तंबी केजरीवाल यांनी दिलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here