Skip to content Skip to footer

अतिदक्षता विभागाच्या स्वतंत्र लॅबसाठी आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे मागणी

अतिदक्षता विभागाच्या स्वतंत्र लॅबसाठी आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे मागणी

              दापोली तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध प्रश्नसाठी दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे १०० बेडच्या रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. परंतु तेथील अतिदक्षता विभागाच्या स्वतंत्र लॅबसाठी कुठलीही मंजुरी मिळालेली नाही ही बाब आमदार योगेश कदम यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्या निर्देशनास आणून दिली. त्यामुळे उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे सुद्धा सांगितले.

              २०१३ सालापासून हा विषय प्रलंबित राहिला असून त्यासाठी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा करण्यात आला नव्हता. ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाला लवकरात लवकर निधी मंजूर करून अतिदक्षता विभागातील स्वतंत्र लॅबसाठी मंजुरी देण्यात यावी यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणीचे निवेदन पत्र योगेश कदम यांनी दिले. तसेच याप्रसंगी तत्परतेने या परिस्थितीची माहिती घेऊन लवकरच ही मागणी पूर्ण केली जाईल असे आश्वासन मंत्री टोपे यांच्याकडून देण्यात आले आहे.

 

Leave a comment

0.0/5