दुर्गंध येत असलेला कांदा कसा घेऊ – छगन भुजबळ
कांदा दरवाढ झाल्याने त्यावर उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने निर्यातबंदी केली आहे. मात्र केंद्र सरकारने परदेशातून मागविलेला कांदा मुंबई बंदरात पोहचला आह्रे. कांदा असलेली ही बोट मुंबई बंदरात आली आहे. हा कांदा राज्य सरकारने घ्यावा असा केंद्र शासनाचा आग्रह आहे. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी या कांद्याची पाहणी केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ ‘कांदा कसा असतो हे मला कळते. केंद्र शासनाने मागवलेला जो कांदा मुंबई बंदरात पोहोचला आहे. त्याला कोंब फुडले आहेत. त्यामुळे बंदरात दुर्गंधी पसरली आहे. माझ्या शेतकऱ्यांचा उत्तम कांदा सोडून असला कांदा मी कशाला घेऊ, असा सवाल पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
त्यानंतर ते म्हणाले, मुंबई बंदरात आलेला कांदा आराने मोठा असून त्याला पोत्यातच कोंब फुटले आहेत. त्याची दुर्गंधी सबंध बंदरात पसरली आहे. हा कांदा घेऊन तो स्वस्त धान्या दुकानांमार्फत ग्राहकांना विक्री करावा, असा केंद्र शासनाचा प्रस्ताव आहे. मात्र ते शक्य होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे, नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. येथे सगळे शेतकरी कांदा उत्पादक आहेत. त्यामुळे कांदा कसा असतो हे मला कळते. त्यामुळे हा कांदा मी कसा घेणार? हा कांदा घेण्यास आम्ही नकार दिला आहे. त्याची काय विल्हेवाट लावायची ती संबंधीतांनी लावावी.