राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येचं गूढ उकललं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येचं गूढ-The mystery of the assassination of a NCP leader

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका नेते आणि माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांच्या हत्येचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पूर्ववैमन्यास्यातून हा खून झाल्याचं समोर आलं आहे. शिवसेना नेते दिनकर पाटील यांनी ही हत्या केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येमागे शिवसेनेच्या नेत्याचा हात असल्याचं उघड झालं आहे. दिनकर पाटील याने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मनोहर पाटलांची हत्या केल्याची माहिती चौकशीत मिळाली. 2016 रोजी शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख असलेल्या दिनकर पाटील यांच्या भावाची हत्या झाली होती. या प्रकरणात मनोहर पाटील यांचा संबंध असल्याचा संशय होता. त्या वैमनस्यातून 6 फेब्रुवारी रोजी मनोहर पाटील यांच्या हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

दिनकर पाटील यांनी त्यांचा पुतण्या आणि एका साथीदाराच्या मदतीनं मनोहर पाटील यांची हत्या केली. दरम्यान कवठेमहांकाळ पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणाऱ्या पाटील हे गावचे उपसरपंच राहिले आहेत. तसेच 2017 मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक लढवत विजयी झाले होते. कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती पद ही पाटील यांनी भूषवले आहे. सध्या पाटील हे कवठेमहांकाळ येथील महंकाली साखर कारखान्याचे संचालक होते. तर खुनाच्या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here