राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही – शरद पवार

राज-ठाकरेंना-गांभीर्याने-Raj-Thakarena-seriously

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही – शरद पवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला आहे. ९ फेब्रुवारी रोजी मनसे तर्फे राज्यात राहणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर इतर पक्षातील नेत्यांनी या मोर्चा संदर्भात भाष्य केले आहे.

               दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली तसेच आपच्या विजयावर केजरीवाल यांचे अभिमानदंन केले.

                   काही लोक राज ठाकरे याच भाषण ऐकायला येतात. तर काही राज ठाकरेंना पाहायला येतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते”, असा चिमटा शरद पवार यांनी काढला. शरद पवारांच्या या टीकेला मनसेकडून काय उत्तर येतं, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता.

                     या मोर्चात नाशिक, पुणे आणि राज्यभरातील मनसैनिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर आझाद मैदान येथे राज ठाकरेंची सभा झाली होती. या सभेलाही प्रचंड गर्दी दिसली होती. मात्र, यावरुन शरद पवार यांनी मनसेवर जोरदार निशाणा साधला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here