महाविकास आघाडीचा फडणवीसांना पुन्हा धक्का, निकटवर्तीय अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द

ठाकरे-सरकारचा-फडणवीसांना-Thackeray-Sarkar-Fadnavis

महाविकास आघाडीचा फडणवीसांना पुन्हा धक्का, निकटवर्तीय अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द

             राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याचे सूत्र सुरूच ठेवले आहे. भाजपाचे मुंबईतील नेते आणि देवेंद्र फडवणीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय उपाध्याय यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. उपाध्यय हे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विकास महामंडळ उपाध्यक्षपदावर कार्यरत होते. आता त्यांची नियुक्त रद्द करण्यात आली आहे.

               उपाध्याय हे मुंबईतील भाजपाचे मोठे नेते असून देवेंद्र फडवणीस आणि दिल्लीतील अनेक भाजपा नेत्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री असताना उपाध्याय यांची ‘म्हाडा’वर नियुक्ती करण्यात आली होती. तसंच त्यांना राज्यमंत्री दर्जा दिला होता. मात्र आता ठाकरे सरकारने त्यांनी नियुक्ती रद्द केली आहे. यापूर्वी ठाकरे सरकारने फडणवीसांच्या काळातील निकटवर्तीयांना दिलेली महामंडळे काढून घेतली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here