वाढदिवसानिमित्त आमदार योगेश रामदास कदम यांचा मुख्यमंत्र्यांकडून जाहीर सत्कार.

योगेश रामदास कदम यांचा मुख्यमंत्र्यांकडून-Yogesh Ramdas Kadam from Chief Minister

रायगड जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदार संघाचे प्रथमच निवडून आलेले युवा आमदार योगेश कदम यांचा आज वाढदिवस. आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसाची विशेष नोंद घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत तसेच बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार योगेश कदम यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी नाणार प्रकल्प संदर्भात तसेच कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी मदत देण्याचे जाहीर केले.

दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या वाढिवसानिमित्त दापोली मतदार संघात विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार आणि आमदार योगेश कदम यांच्यासारख्या नव्या पिढीच्या हातात राज्याच्या विकासाची जबाबदारी आजच्या शिक्षित तरुणाने दिलेली आहे. आज मतदार संघातील मंडणगड पर्यटन विकास चालना देण्यासाठी, मतदार संघात रक्तपेढी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे केलेली शिफारस, १०० बेडेड रुग्णलयाच्या निर्माणासाठी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केलेला पाठपुरवठा, असे मतदार संघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आमदार कदम सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कामांची गती अशीच गतिमान राहू दे व युवा पिढीच्या हाताने नवे पर्व महाराष्ट्रात येऊ देत अशा मनस्वी शुभेच्छा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here