माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयात हजर राहण्याची शेवटची संधी कोर्टाकडून देण्यात आलेली आहे. यापूर्वी सुद्धा कोर्टाकडून फडणवीस यांना हजर राहण्यासंदर्भात समंत जरी करण्यात आलेला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवण्याचा आरोप फडणवीसांवर लावण्यात आलेला आहे. माहिती लपवण्याच्या याचिके सदर्भात फडणवीस कोर्टात हजर राहणार आहे.
सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. ही याचिका जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात रद्द करण्यात आली होती. परंतु सर्वोच न्यायालयाने या संदर्भात सुनावणी पुन्हा एकदा जिल्हा न्यायालयात चालवण्याचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे गुरुवारी फडणवीस कोर्टात हजर राहणार आहे. यापूर्वी सुद्धा नागपूर न्यायालयाने फडणवीसांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते परंतु ते स्वतः हजर न राहता त्यांचे वकील हजर राहत होते.