Skip to content Skip to footer

राजकीय स्वार्थापोटी आधी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आता बाळासाहेबांच्या नावाचा भाजपकडून वापर.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना पक्षाने आपल्या २५ जुन्या मित्राला दूर सारून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली. या सर्व घडलेल्या घडामोडीला भाजपा आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा खोटारडेपणाच कारणीभूत आहे. फक्त आपणच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे, या आडमुठीपणामुळे त्यांनी आपल्याच पक्षातील अनेक नेत्यांना नाराज केले आणि त्यांचा राजकीय प्रवास संपवला होता.

आज राज्यात महाविकास आघाडी सरकार समाजाच्या हिताचे निर्णय घेत असल्यामुळे राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला आपला पाठिंबा दर्शविला आहे. म्हणूनच आघाडी सरकारला अडचण निर्माण करण्यासाठी आधी सावरकर आणि आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुद्दा बाहेर काढत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. तर दुसरीकडे मिसेस फडणवीस फक्त शिवसेनेवर टीका करून माजी मुख्यमंत्र्यांना एकप्रकारे मदतच करत आहे.

आज तागायत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विसरलेली भाजपा, सत्ता गेल्यानंतर पुन्हा सावरकरांचा मुद्दा का उकरून काढत असेल? तसे पहिले तर सावरकर यांच्या विरोधात अपशब्द काढणाऱ्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीला शिवसेना खासदार शेवाळेंनी माफी मागायला लावली होती. तेव्हा भाजपा सत्तेत गुंग होती आणि आज सत्ता गेल्यनानंतर पुन्हा एकदा भाजपाला सावरकर प्रेम आठवायला लागले आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी किंवा शिवसेना पक्षाने कधीच सावरकरांचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला नाही. याची प्रचिती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनके भाषणातून महाराष्ट्राच्या जनतेला आलेली आहे. परंतु आज सत्तेच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित करून फक्त महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणायचे काम केले जात आहे. म्हणून आज भाजपाच्या आयटीसेलच्या पगारी कर्मचाऱ्यांनकडून नसते उद्योग चालवण्याचा प्रकार भाजपा पक्षाने चालू केला आहे.

Leave a comment

0.0/5