दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? सामानातून चंद्रकांत पाटलांना सवाल…

दादामियां-इतिहास-पुरुष-Grandparents-History-Men

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची दैनिक सामनाच्या संपादक पदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या अग्रलेखात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भाजपाचे ‘दादामियां’ असा उल्लेख करत दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? असा खडा सवाल त्यांना ‘सामना’तून विचारला आहे.

भाजपाचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? त्यांना इतिहासाचे उत्खनन करण्याची इतकीच आवड असेल, तर पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्याचे त्यांच्या लक्षात यायला हवे होते, असां टोला अग्रलेखातून लगावला ,
दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरुन काढली, तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही, हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते, तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करुन लढत होती. दादामियां हे ध्यानात ठेवा!’ असा थेट इशारा ‘सामना’तून देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here