मोदीच्या निर्णयानंतर आता मिसेस फडणवीस राहणार सोशल मीडियापासून दूर

मोदीच्या निर्णयानंतर आता-Now after the Modi decision

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. या बाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी सुद्धा सोशल मीडियापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. “काही वेळेला एक लहान निर्णयही आपलं आयुष्य बदलून टाकतो. मी माझ्या नेत्याने ठरवलेल्या निर्णयाच्या मार्गाने जाणार”, असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे

.येत्या रविवारी मी फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूबसह मी माझे सर्व सोशल मीडिया अकाऊंट सोडण्याचा विचार करत आहे. याबाबत मी तुम्हाला माहिती लवकरच देईन”, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. त्यांच्या याच ट्विटला रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. परंतु अमृता फडणीवसांच्या या ट्विटनंतर राज्यातील राजकीय वातावरण शांत राहण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपला शासकीय “वर्षा” बांगला सोडावा लागला होता. तसेच त्यांच्या अनेक निर्णयाला महाविकास आघाडीने स्थागिती दिली होती. त्यामुळे चवताळलेल्या मिसेस फडणवीसांनी शिवसेना आणि पक्षाच्या नेत्यावर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल सुरु केला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेत्यांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here