Skip to content Skip to footer

भाजपा आमदाराचा अजब प्रकार क्रिकेट सामन्यात मराठी खेळाडूंना नो एन्ट्री….

डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्याची आता सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. सध्या त्याचे एक पत्रक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या क्रिकेट सामन्याच्या आयोजनासाठी तयार करण्यात आलेल्या त्या पत्रकामध्ये अशी टीप लिहिली की तो क्रिकेट सामना फक्त गुजराती,कच्छी आणि मारवाडी भाषिक समाजासाठीच आयोजित करण्यात आलेला आहे. या सगळ्या प्रकाराने मराठी प्रेमी जनते मध्ये आता संतापाची लाट पसरलेली आहे.
एकीकडे भाजपा मराठी भाषा आणि जनतेविषयी प्रेम असल्याचा आव आणते तर दुसरीकडे मराठी भाषिक जनतेचा द्वेष करताना दिसून येते. तसेच हा कार्यक्रम आयोजित करणारे आमदार रवींद्र चव्हाण स्वतः मराठी आहेत आणि स्वतः मराठी असून फक्त कुठेतरी आपल्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी हा किळसवाणा प्रकार चव्हाणांनी केला आहे. यावर मराठी विषयी प्रेम दाखवणरे भाजपा नेते काय कारवाई करतात हे आता पाहावे लागणार आहे.

Leave a comment

0.0/5