हा निर्णय मुख्यमंत्री म्हणून अधिकच समाधान देणारा – उद्धव ठाकरे

खाजगी-डॉक्टरांनी-दवाखाने-Private-doctors-clinics

नागपूर अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. १० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमच्या सरकारचा निर्णय हा मुख्यमंत्री म्हणून मला सर्वात समाधान देणारा निर्णय होता,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी गेल्या १०० दिवसांतील सरकारच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. ‘कर्जमुक्ती योजनेचे काम व्यवस्थित सुरू आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची सुरुवात झाली आहे. या परिषदेत सामनाचे संपादकपद, अयोध्या दौरा याविषयी सुद्धा सविस्तर चर्चा केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here