Skip to content Skip to footer

महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, येत्या १८ तारखेला लागणार निकाल…

महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, येत्या १८ तारखेला लागणार निकाल…

राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक बिनविरोध झालेली आहे. तसेच एकही जादा अर्ज या जागेसाठी आलेले नाही आहे. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १८ मार्चला या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार असून, महाराष्ट्र राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होईल असे स्पष्ट झाले आहे. या जागेवर भाजपा कडून ३, राष्ट्रवादी २, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचा एक -एक उमेदवाराने राज्यसभेसाठी अर्ज दाखल केलेला आहे.

राज्यसभेच्या जागेवर अर्ज भरताना भाजपा पक्षातूनच नाराजीचे सूर उमटताना दिसून येत होते. राज्यसभेसाठी संजय काकडे आणि एकनाथ खडसे हे इच्छुक होते, परंतु पक्ष श्रेष्ठींनी या दोघांच्या नावाचा विचार न करता डॉ. भागवत कराड यांच्या नावाला पसंती दिली होती. राज्यसभेसाठी राज्यातून शरद पवार, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, छत्रपती उदयनराजे भोसले, रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, राजीव सातव यांनी अर्ज दाखल केले आहे.

Leave a comment

0.0/5