आमदार नितेश राणेंनी बालिशपणा सोडावा – संदेश पारकर

आमदार नितेश राणेंनी बालिशपणा-Childhood by MLA Nitesh Rane

आमदार नितेश राणेंनी बालिशपणा सोडावा – संदेश पारकर

सध्या राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये झपाटयाने वाढ होत आहे तर अंशतः मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. अशातच सर्वच्या सर्व आमदार आणि खासदार घरूनच मतदार संघात मदत पोहचवण्याचे काम करत आहेत. मात्र असे काही अती उत्साही आमदार कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता सर्रास मतदार संघात फिरताना आढळत आहेत. असेच कोकणातील आमदार नितेश राणे कोरोनाच्या बिकट परिस्तिथीत सुद्धा कार्यकर्त्यांना घेऊन या कठीण परिस्थितीत मतदार संघाचे दौरा करताना आढळुन आले आहेत. त्यांच्या या कृत्यावर शिवसैनिक संदेश पारकर यांनी जोरदार टीका केली आहे.

सोबत त्यांच्या फेसबुक वॉल वरील पोस्टराज्यात कोरोनाने कहर मांडला असून मोठ्या शहरांत बाधितांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती चांगली असली तरी आमदार नितेश राणे यांच्या चमकोगिरी आणि पोरकटपणामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. किमान आता तरी आमदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्याची आवश्यकता आहे.

 

आमदार नितेश राणे यांनी या कठीण परिस्थितीत तरी बालिशपणा सोडावा..चमकोगिरी बंद करा, परिस्थितीचे गांभीर्य ओळखाराज्यात…

Posted by Sandesh Parkar on Monday, 27 April 2020

राज्यात लॉकडाऊनची घोषणा होऊन आता महिना संपून गेला आहे. या महिनाभरात जिल्ह्यातील आणि आपल्या मतदारसंघातील नागरिक कोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत, याची पाहणी करावी, अधिका-यांशी बोलावे, चर्चा करावी, असे या आमदारांना वाटले नाही.

जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाताच हे महाशय दाखल झाले. दाखल होताच नेहमीप्रमाणे पब्लिसिटी स्टंट देखील सुरु केला. लवाजमा घेऊन काढलेला खारेपाटण, तळेरे, फोंडा दौरा, सोबत शंभर कार्यकर्ते आणि रिक्षा घेऊन केलेली अनाउन्समेंट ही आमदारांच्या चमकोगिरीची उदाहरणेच आहेत.

या संपूर्ण दौऱ्यात आमदारांनी जमावबंदीचे नियम धाब्यावर बसवले. कार्यकर्त्यांची फौज बरोबर घेऊन फिरुन आमदारांनी सोशल डिस्टन्सिंगचा बो-या वाजवला. जे आवाहन प्रशासन गेले महिनाभर करीत आहे, तेच त्यांनी माईकवरुन केले.
आमदारांच्या बालबुद्धीचा कहर म्हणजे त्यांनी कॉरंटाईन कक्षाला दिलेली भेट. आमदारांनी या कक्षात कॉरंटाईन केलेल्या रुग्णांशी चर्चा केली आणि नंतर ते पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांत मिसळले. वास्तविक अशा रुग्णांची भेट घेणे हाच मुळात बालिशपणा होता. आता यातून काही भलतेच घडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?

काही दिवसांपूर्वी खासदार सन्माननीय विनायक राऊत साहेब यांनी मतदारसंघात पाहणी करुन अधिका-यांशी चर्चा केली होती आणि त्यांना मार्गदर्शन केले होते. त्यावेळी आमदारांचे कार्यकर्ते ऊर बडवून घेत होते. आता तर स्वतः आमदारांनी या संवेदनशील परिस्थितीत चक्क जनतेत मिसळून आणि कॉरंटाईन कक्षाला भेट देऊन गांभीर्याचा विचका केला आहे. नियमांची अशी उघड पायमल्ली करणा-या आमदारांचेच यंत्रणेने संस्थात्मक कॉरंटाईन करण्याची आवश्यकता आहे.
आपण सगळे राजकारणी आहोत. पण राजकारण करण्याची वेळ असते. 24 तास जाहिरातबाजी आणि चमकोगिरी करुन काहीही उपयोग नाही. त्यातून नुकसानच होणार आहे. आमदार नीतेश राणे यांनी बालिशपणा सोडून द्यावा, चमकोगिरीचा अट्टाहास सोडावा आणि काही दिवस लोकांत न मिसळता नियम पाळून अधिका-यांच्या फक्त बैठका घेतल्या तरी सर्वांवर उपकार होतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here