फडणवीस कोरोनाच्या युद्धात कमी राज भवनात जास्त दिसतात – गृहमंत्री

फडणवीस कोरोनाच्या युद्धात कमी -Less in the battle of Fadnavis Corona

फडणवीस कोरोनाच्या युद्धात कमी राज भवनात जास्त दिसतात – गृहमंत्री

सध्या एकीकडे कोरोनाच्या संसर्गाचे संकट आलेले असताना राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचे सरकार कसे पडेल यासाठी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहेत. या उद्भवलेल्या परिस्थितीत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात, असे म्हणत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्व पक्षांच्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. आम्हाला आता राजकारण करायचं नाही, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत पोलीस, डॉक्टर्स, नर्स तसेच सफाई कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांचा सरकारला अभिमान आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here