मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यां-Chief Minister Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह 18 पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. महाराष्ट्रात ‘कोरोना’चे संकट गडद होत असताना उद्धव ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांची मतं जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्री सध्याची कोरोना संदर्भातली सरकारची तयारी आणि राजकीय पक्षातील नेत्यांच्या सूचना आणि अपेक्षित सहकार्य याविषयी चर्चा करणार आहेत. दुपारी दोन वाजता ही सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत सल्लामसलत करणार आहेत. महाविकास आघाडीतील दिग्गज नेते या बैठकीत सहभागी असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निमंत्रण आहे. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी या आधीही ‘कोरोना’च्या संकट काळात राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा होत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे राज ठाकरे सरकारला काय सूचना करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here